Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यात कोरोनाचा कहर : मृत्यूंची संख्या १२६ वर

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर अखेर नागरिकांच्या जीवावर वेतत दिवसंदिवस रुग्ण संख्येत भयानक वाढ होत असून काही रुग्णांना अखेर उपचार दरम्यान आपले प्राण गमवावे लागत असल्याने आता कोरोना संसर्गाची दुसरी लाटेने सऱ्यांचीच झोप उडविल्याने अनेकांची चिंता वाढत असल्याचे संकेत मिळत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता रोहा प्रशासनाला पुन्हा कंबर कसावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .

संपूर्ण जगभरात कोरोनाने हा हा कार माजवला लाखोंच्या संख्येने बळी गेले देशात व राज्यात कोविड 19 ला आता जवळपास चौदा ते पंधरा महिने उलटून गेले त्याला रोखण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत पुन्हा उद्धभवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र देशात व राज्यात मोठी महामारी निर्माण झाली आहे त्यात आता ग्रामीण भागातील नागरिकांचा नाहक बळी जात आहे यासाठी याला हद्दपार करण्यासाठी राज्य पातळीवर विकेंड लॉकडाऊन केला तर रोहा तालुक्यात त्यावर अधिक भर देत ७ मे ते १३ पर्यंत कडकडीत बंद पुकारण्यात आले आले होते तरी देखील कोरोनाच्या वाढता कहराने अनेकांचा चिंतेचा विषय बनला आहे परंतु दिवसंदिवस रुग्णांची वाढती संख्या त्यात मृत्यूंच्या संख्येत होत असलेली वाढ मोठी चिंताजनक ठरत असली तरी त्याप्रमाणे रुग्ण बरे करण्यात यंत्रणेला देखील झपाट्याने यश प्राप्त होत असल्याचे संकेत मिळत आहेत .

रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात दिवसंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही गुणाकाराच्या दुपटीने वाढत आहे त्यात रोहा हा ग्रामीण भाग गणित आहे त्यामुळे
साऱ्यांचीच धास्ती वाढली आहे वाढत्या रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर खाट उपलब्ध न झाल्याने त्यांना उपचार दरम्यान प्राण गमवावे लागत आहेत .तालुक्यात मागील दोन दिवसांपूर्वी १३ मे रोजी कोरोनाचे आढळले तब्बल नवीन ८० रुग्ण तर त्यांची संख्या खाली होत १४ मे रोजी ४२ रुग्ण तर ५१ रुग्ण बरे होऊन परत गेले तर मृत्यू संख्येत वाढ होत
१२१ वरून ही संख्या आता १२६ पोहचली आहे १४ मे रोजी ५१ रुग्णांनी मात करत ठणठणीत बरे होऊन घरी परतले त्यामुळे बरी होणारी रुग्णसंख्या वाढताना दिसत असली तरी कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण रोहा तालुक्यात जागो जागी विकेंड लॉक डाऊन म्हणून नाका बंदी देखील केली गेली असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे .

कोरोनाच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.कोरोणाचे तब्बल १४ मे अखेर १०२२ हुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.गेले काही दिवस रुग्ण संख्या नियंत्रणात येत आहे की नाही त्यामुळे रोहा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत आहे.
कोविड १९ ने बाधित झालेले एकूण रुग्ण ४८९० झाले आहेत. आता पर्यंत १२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य यंत्रणेच्या यस्ववी प्रयत्ना नंतर तसेच स्वतःच्या इच्छाशक्ती व रोग प्रतिकार शक्तीच्या जोरावर आता पर्यंत रोहा तालुक्यात ३७४२ रुग्णांनी कोरोणावर यशस्वी मात केली असल्याची माहिती आहे.

रोहा तालुक्यातून खऱ्या अर्थाने कोरोनाला हद्दपार करायचं असेल तर संपूर्ण रोहा तालुक्यातील नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याची गरज आहे विनाकारण गर्दी टाळावी लग्न विवाह सोहळे तूर्तास पाच ते दहा नागरिकांमध्येच करा आत्यावशक कारणासाठीच घराबाहेर बाहेर पडले पाहिजे शासनाची जबाबदारी ती प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आपले कुटूंब आपली जबाबदारी आपले आरोग्य आपल्या हातात तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्याला काही संसर्ग जाणवत असेल तर कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय न करता अथवा मनात कोणत्याही प्रकारची भय व भीती न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घेत योग्य तो उपचार करावेत

डॉ सागर सानप

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.