सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
आई वडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलाच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त उरण कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्यांचे वाटप आज करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
सौ.ऊर्मिला रमेश म्हात्रे व त्यांचे पती रमेश भास्कर म्हात्रे आवरे उरण यांनी आपल्या एकुलता एक मुलगा स्व . उन्मेष रमेश म्हात्रे यांच्या ९ व्या स्मृतिदिन सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी आहे. त्यानिमित्त त्यांनी आज उरणमधील कोविड आरोग्य केंद्रावर उपचार घेणारे रुग्ण, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी पीपीकिट, एन १९ मास्क, हॅन्डग्लोज आदी वैद्यकीय साहित्यांचे वाटप तालुका आरोग्य अधिकारी डॉ . ईटकरे, डॉ स्वाती म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, डॉ. अरुणकुमार भगत आरोग्य सभापती महानगर पालिका पनवेल, संतोष पवार, सुनील भोपतराव, प्रा.नरेंद्र पाटील, योगेश कडू आदी उपस्थित होते.








Be First to Comment