सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकता मंच सामाजिक संस्था व ग्रामपंचायत घारापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने घारापुरी बेटावर मोफत धान्य किटचे वाटप करण्यात आले.
लाॅकडाऊनमुळे घारापुरी बेटावरील सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने ग्रामस्थांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्याअनुषंगाने नितीन सुरेश लाड यांच्या प्रयत्नातून एकता मंच सामाजिक संस्था मुंबई व ग्रामपंचायत घारापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना मोफत धान्य किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे नितीन लाड, सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे व इतर सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment