सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
रोहा तालुक्यातील शेणवई गावच्या आदिवासीवाडी मध्ये एका इसमाची कोयत्याचे वार करून हत्या करण्यात आली.तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नजिकच्या झाडाझुडपात मृतदेह फेकून आरोपी फरार झाले होते.या आरोपींना त्वरित पकडण्यात रोहा पोलिसांना मात्र यश आले आहे.
याबाबत रोहा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,सदर घटना गुरुवार दिनांक १३ मे रोजी सायं. साडेआठ वाजता घडली.मयत रामभाऊ पिंट्या जाधव (रा. शेणवई आदिवासीवाडी) यांना पप्पू जाधव यांनी शिवीगाळ करत भांडण केले.तर मोहन जाधव याने घराचा दरवाजा पहारीने फोडून घरात शिरून नुकसान करत मयत रामभाऊ यांना पहारीने मारहाण करून घराच्या बाहेर ओढत आणले. तर पप्पू जाधव व राम जाधव या दोन्ही आरोपींनी मयत व्यक्तीला काठीने मारहाण केली, मात्र आरोपी मोहन जाधव यांनी आपल्या हातातील कोयत्याने रामभाऊच्या खांद्यावर आणि पाठीवर कोयत्याने हल्ला केला त्यात रामभाऊ जबर जखमी होऊन जागीच ठार झाले.
मयत रामभाऊ याला या तिन्ही आरोपीने ओढत नेऊन शेणवई आदिवासी वाडी वरील भेंड्याचा माळ येथे झाडी-झुडप्यात नेऊन टाकले.
दरम्यान सदर या घटनेची फिर्याद मयताची पत्नी सुरेखा रामभाऊ जाधव(६०) यांनी रोहा पोलिस ठाण्यात दिली.सदर घटनेची संपूर्ण माहिती मिळताच पिता-पुत्रासह तिन्ही आरोपींना रोहा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत पोलिस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम अलिबाग यांच्यासह रोहा पोलीस उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी,रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांसह सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत.








Be First to Comment