Press "Enter" to skip to content

पेणमधील शवदाहिनीला शॉर्टसर्किटमुळे आग

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

नगरपालिकेच्या हद्दीतील वैकुंठधाम स्मशानभूमीत असणा-या विद्युत शवदाहिनीला आज सकाळी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पॅनलचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. यावेळी त्वरित नगरपालिकेच्या अग्निशामक दलानी सदर आग आटोक्यात आणली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पेण शहरांमध्ये मागील दोन-तीन महिन्यांपासून मृतांची संख्या वाढत असल्याने शवदाहिनीच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. नगरपालिकेच्या जुन्या असलेल्या शवदाहिनीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून वायरिंग व पॅनलचे नुकसान झालेले आहे.

सदर शवदाहिनी कंपनीच्या इंजीनियरिंग यांना बोलून याची दुरुस्ती करण्यात येणार आहे मात्र यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे दरम्यान जर मृत्यूची घटना झाल्यास जुन्या लाकूड पद्धतीने दहन करण्यात येईल तसेच त्वरित नवीन शवदाहीनीचे ही टेंडर्स काढण्यात येणार आहे.

शिवाजी चव्हाण — आरोग्य अधिकारी पेण नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.