सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. उरणमध्ये ही ३ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. परंतु त्यातील उरण शहरातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी येणारे हे आदल्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजल्यापासून सकाळी नंबर लागेपर्यंत रांगेत उभे रहात आहेत. यामध्ये जेष्ठ नागरिकांचाही समावेश असतो. तरी संबंधित रांगेत नंबर लावण्यासाठीचे नियोजनचा अभाव जाणवतो.
तसेच या ठिकाणी नंबरसाठी उन्हातान्हात उभे रहात असलेल्यांच्यासाठी पाणी अथवा बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने नाराजीचा सूर निघत आहे.
लसचा तुडवडा जाणवत असल्याने ज्या दिवशी लस मिळणार असते त्या दिवशी माणसांचा लोंढाच्या लोंढा लस घेण्यासाठी लस केंद्रावर गर्दी करीत असतात. त्यावेळी सोशल डिस्टंटचा अभाव जाणवत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उरणमध्ये शहरात नगरपालिका शाळा, कोप्रोली व जेएनपीटी वसाहत असे ३ लसीकरण केंद्र आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर फक्त १०० डोस देण्यात येतात. डोस घेण्यासाठी नागरिक रात्री ८ ते ९ वाजल्यापासून रांगेत उभे असतात. ते रात्री झोपण्याचे साहित्य घेऊन त्याच ठिकाणी झोपतात. त्याठिकाणी रात्री अपरात्री काही घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. यामध्ये ६० ते ७० वर्षापेक्षा जेष्ठ नागरिकांचाही समावेश असतो. तसेच रात्रभर लस घेण्यासाठी असलेल्या नागरिकांसाठी कोणतीच बसण्याची, पाण्याची सोय नसते, डोक्यावर साधे छपरही नसल्याने नंबरचे टोकन वाटेपर्यंत त्यांना उन्हातच उभे रहावे लागते.
लस घेताना नाष्टा करणे महत्त्वाचे असतानाही रात्रभर रांगेत उभे राहून दुपारी लस घेताना त्यांची हालत काय होत असेल. याचा सारासार विचार प्रशासनाने करून याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी जेष्ठ नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.








Be First to Comment