Press "Enter" to skip to content

धाटावमधे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उद्घाटन

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धाटाव मार्फत रायगड जिल्हा परिषद शाळा धाटाव मधे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.या नजिकच्या लसीकरण केंद्रामुळे विभागातील नागरिकांना मात्र चांगलाच दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, रोहा पंचायत समितीच्या उपसभापती विजया पाशिलकर,माजी उपसभापती अनिल भगत,उपसरपंच यशवंत रटाटे, ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ससाणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण,आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक श्री.रूगे,आरोग्य सेविका शिल्पा पाटील, स्वप्ना चींचाळकर,आरोग्य सहायिका पानसरे यांसह आरोग्य सेविका, कर्मचारी व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान या लसीकरण केंद्रामुळे सबंध पंचक्रोशीतील नागरिकांना अगदी नजिकच्या केंद्रात लस उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची होणारी फरफट थांबणार आहे तर तालुक्याच्या मुख्य ठिकाणी लाभार्थ्यांना होणार्‍या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.