
दुर्मीळ होत चाललेल्या टाकळा वनस्पती संवर्धनासाठी अनोखा उपक्रम
सिटी बेल लाइव्ह / उरण (सुभाष कडू)
टाकळा हि वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण आशी रानभाजी म्हणून ओळखली जाते.उरण मध्ये मुबलक प्रमाणात आढळणारी ही रानभाजी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्या निरिक्षणात आढळून आले आहे.तेव्हा टाकळा या भाजीचे संवर्धन करण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने टाकळा संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.त्या साठी त्यांनी टाकळा संवर्धन स्पर्धा आयोजीत केली आहे.
टाकळा म्हणजे माळरानात, डोंगर भागात, परसात निसर्गात कुठेही उगवणारी एक वनस्पती.ती एक रानभाजी असून फार आयुर्वेदिक देखील आहे.टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. दोन फुटा पर्यंत वाढणारी टाकळा हि वनस्पती पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो. या वनस्पतीला उग्र वास येत असला तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.तर औषधात हिचे पंचांग वापरले जातात.डोंगराचे उत्खनन , बदललते वातावरण, नव्या पिढीचे दुर्लक्ष,जंक फुड खाण्याचे वाढते प्रमाण आदि कारणामुळे टाकळा ही वनस्पती आता उरण मधून नष्ट होत आहे.
या अभिनव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतीही फि किंवा वयाची अट नाही.या स्पर्धेत संपूर्ण उरण तालुका,पेण तालुक्यातील फक्त दादर,उरर्णोली,सोनखार,रावे,खारपाडा, दूरशेत, बळवली, कळवा, ही गावे तर पनवेल तालुक्यातील फक्त केळवणे, साई,कासारभट,दिघाटी या गावांतील नागरिकांना स्पर्धत भाग घेता येईल.तर एकूण 11 विजेत्यांना पुरस्कार,रोख रक्कम,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात येईल.त्याचबरोबर सहभागी सर्वाना प्रमाणपत्र देण्यात येतील असे वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे गुरुजी यांनी सांगीतले आहे
अशाप्रकारे घेतली जाणार स्पर्धा
या स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकाने आपल्या आजूबाजूला, डोंगरात, माळरानात कुठे ना कुठेतरी उगवलेली टाकल्याची रोपे शोधायची आहेत. सदर रोपे व्यवस्थित काढून ति त्यांने एखाद्या कुंडीत लावावी,एखादा वाफा तयार करुन त्यात लावावी.किंवा
आपल्या परसात, गॅलरीत एखादा कोपरा तयार करुन त्यात लावावी. त्या नंतर लावलेल्या टाकल्याच्या रोपाचा फोटो,किंवा केलेल्या टाकला बागेचा,कुंड्यांचा फोटो टाकला संवर्धन समुहावर किंवा 9819652951 या व्हाटस्अपवर नंबरवर टाकावा.या नंतर स्पर्धकाने लावलेल्या टाकळ्याच्या रोपाला साधारण दिवाळी मध्ये शेंगा येतील. सदर शेंगा जून (परिपक्व) होण्याच्या काळात परिक्षण केले जाईल. तो पर्यत आपले रोपटे, आपली टाकल्याची बाग जपून ठेवावी लागेल.
रानभाज्या या निसर्गाने मानवाला दिलेल औषधी गुणाने परिपूर्ण असे खाद्य.त्यांच संवर्धन करण ही काळाची गरज आहे.आमच्या निरीक्षणातून टाकला हि मुबलक प्रमाणात आढळणारी रानभाजी आलिकडे दुर्मिळ झाली आहे.त्यामूळे तिच संवर्धन करण्याच आमच्या मंडळाने ठरवल आहे.
मच्छिंद्र म्हात्रे — कार्यवाहक वशेणी इतिहास संपादकीय मंडळ






Be First to Comment