Press "Enter" to skip to content

वाशिवलीत डॉ पारनेरकर महाराज विद्यालयात लसीकरण केंद्र सुरू

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

वाशिवली येथील डॉ पारनेरकर महाराज विद्यालयात ग्रुप ग्रामपंचायत वडगांव यांच्यावतीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सरपंच गौरी महादेव गडगे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार ग्रुप ग्रामपंचायत वडगांव व प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप यांच्यामार्फत ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वाशिवली येथील डॉ.पारनेरकर महाराज विद्यालय येथे कोरोना प्रतिबंधक ( कोविशिल्ड ) लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

वडगाव पंचक्रोशीत लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.किरण पवार व आरोग्य विभागाचे कर्मचारी , ग्रामविकास अधिकारी रश्मी रविद्र शिंदे , ग्रामपंचायत सदस्य महादेव कमलाकर गडगे , हरेश भागा पाटील , राजेश हरिश्चंद्र पाटील , नंदकुमार दत्तात्रेय पाटील , शिवाजी शिदे ,सदेश मालकर , कल्पना मदन ठोंबरे ,जयश्री बाळकृष्ण पाटील तसेच संदीप शंकर पाटील ,संतोष लडकू पाटील सर्व आशासेविका , ग्रा.पं.कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील लसीकरण केंद्रासाठी जिल्हा परिषद सदस्या पद्माताईं सुरेश पाटील यांचे मोलाचे योगदान असल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.