माजी सरपंच लक्ष्मण पारंगे यांना लस टोचून शुभारंभ
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
खालापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत आहे. जवळपास ५३००० हजार लोकसंख्या असलेल्या या वासांबे ग्रामपंचायत हद्दित मोहोपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काही दिवसापुर्वी एक लसीकरण केंद्र सुरू झाले आहे .वासांबे ग्रामपंचायत परिसरातील लोकसंख्या पाहता कमीत कमी ५ लसीकरण केंद्राची वासांबे मोहोपाडा हद्दीत आवश्यकता असताना सध्या मोहोपाडा उपकेंद्र आणि रिस उपकेंद्रात लसीकरण सुरु झाल्याने रसायनीकरांना काहीअंश दिलासा मिळत आहे.
वासांबे मोहोपाडा परिसरात लसीकरण केंद्र सूरू होण्याअगोदर येथील नागरिकांना लस घेण्यासाठी चौक,खालापूर,अजिवली,आपटा या ठिकाणी जावे लागत असल्याने नागरिकांना खुपच त्रास सहन करावा लागत होता.परंतु आता वासांबे ग्रामपंचायत हद्दित दोन लसीकरण केंद्र सूरू झाल्याने वासांबे परिसरातील जनतेला या लस केंद्रामुळे दिलासा मिळणार आहे. रसायनी परिसरातील नागरिकांनी लस घेतल्यानंतर रसायनीत कोरोना रुग्ण संख्या वाढ दर कमी होण्यास मदत होणार आहे.यातच पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमाने रिस येथे दुसरे लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.या लसीकरण केंद्रात सर्वप्रथम माजी सरपंच लक्ष्मण पारंगे यांना लस टोचून नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले.
यावेळी लोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रसाद रोकडे, पंचायत समिती सभापती वृक्षाली पाटील, महिला व बालकल्याण माजी सभापती पंचायत समिती माजी सभापती कांचन पारंगे,माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी सरपंच संदीप मुंढे,माजी सरपंच लक्ष्मण पारंगे,माजी सरपंच शशिकांत मुकादम,युवक कॉंग्रेसचे सचिव निखिल डवले,तालुका काॕग्रेस अध्यक्ष नाना म्हात्रे,संजय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य माधुरी जांभले, श्वेता कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.आदीसह पदाधिकारी नागरिक यांच्या उपस्थितीत रिस येथे राजिप शाळेत लस केंद्र सूरू करण्यात आले.

या लस केंद्रास खालापूर तहसिलदार इरेश चप्पलवार यांनी भेट देऊन पाहणी केली असता लस केंद्रात येणाऱ्या नागरिकांसाठी केलेले प्रशस्त नियोजन पाहून तहसिलदारांनी समाधान व्यक्त केले.माजी सभापती कांचन पारंगे, माजी सरपंच कृष्णा पारंगे व सहकारी हे उत्तमोत्तम प्रशस्त नियोजन व शासनाच्या नियमांचे लस केंद्रात तंतोतंत पालन होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करून नियोजन करत आहेत.








Be First to Comment