सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
“संकट गंभीर तेथे शिवसेना खंबीर” या पक्षाच्या ब्रीदवाक्या प्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एका निष्ठावंत शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत व कोविड महामारीची ची समस्या लक्षात घेऊन उरण कोविड सेंटर, बोकडविरा येथे कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या १५० चादरी भेट देण्यात आल्या.
याप्रसंगी नगरसेवक अतुल ठाकूर, उपशहरप्रमुख गणेश पाटील, शिक्षक सेना कोकण विभाग कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर यांनी सदर १५० चादरी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार व डॉ. स्वाती म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
या अगोदर ही उरण कोविड रुग्णालयाची गरज ओळखून आवश्यक त्या आरोग्य विषयक वस्तू शिवसेनेतर्फे देण्यात आल्या आहेत. यापुढे ही शिवसेनेतर्फे सामाजिक कार्य या माध्यमातून ही मदत चालूच राहिल असे गटनेते गणेश शिंदे यांनी सांगितले.








Be First to Comment