परिचारिका(नर्स) दिनाचे औचित्य साधून उरण कोविड सेंटर मधिल परिचारिका, डाॅक्टर व रुग्णांना ऑक्सिजन पूरक झाड व हॉट अँड कोल्ड वॉटर बॉटलचे वाटप
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
कोरोनाची माहामारी दिवसेंदिवस वाढत असतांना यावर महाराष्ट्र राज्य सरकार मोठ्या शर्थीने लढा देत आहे. आरोग्य विषयक सेवांवर मोठ्या प्रमाणात जोर देऊन सुरक्षा कवच म्हणून जनसामान्य पर्यंत पोहचत आहेत. गेल्या वर्ष भरामध्ये विविध माध्यमातून कोविड काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सतत सर्वसामान्यांना मदत करणारे, जनतेच्या मनातील उरणचे खरे कोव्हिड योद्धा मा.आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी त्यांच्या लग्नाच्या ३५ व्या वाढदिवसाचे तसेच परिचारका दिनाचे औचित्य साधून उरण कोविड सेंटर मधील डाॅक्टर, नर्स, वार्ड बाॅय तसेच रुग्णांना आॅक्सिजन पुरक झाडे आणि हाॅट-कोल्ड वाॅटर बाॅटल चे वाटप करण्यात आले.


यावेळी उरण सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार तसेच उरण मेडिकल-डॉक्टर असोसिएशनचे सदस्य व कोव्हिड सेंटर मधील कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment