ग्रामस्थांनी मानले ग्रामपंचायतीचे आभार
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील रासळ शिल्पकार नगरमध्ये रासळ ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे पाणी-वीज, रस्ते आदी मूलभूत नागरी सेवा-सुविधा मिळाल्या आहेत. त्यामुळे बाळासाहेब जाधव व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात 4 विजेचे पोल त्यावर लाईट बसविण्यात आली आहे. तसेच येथील नळांना मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शिल्पकार नगर मधील जनतेला भेडसावणारे, प्रश्न सुटले असून विविध समस्या मार्गी लागल्या आहेत. रासळ ग्रामपंचायतीचे कार्यकुशल माजी सरपंच व सदस्य नरेश खाडे, सरपंच विष्णु मोरे, उपसरपंच धनंजय म्हस्के, सदस्य रिया म्हस्के आणि मंगेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने शिल्पकार नगरमध्ये रोडवर आणि गावात लाईट आली आहे. मुबलक पाणीपुरवठा सुरू झाला. तसेच यांच्या मार्फत आता पुढील विकासकामे केली जाणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थ खूप समाधानी आहेत.






Be First to Comment