सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील कोव्हीड हेल्थ केअर सेंटरमधील रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी आणि रुग्ण बरे व्हावे यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. उरणमधील मुस्लिम कमिटीने देखील आपल्या पवित्र रमजान महिन्यातील खर्च कमी करून, काही भाग हा कोव्हीड रुग्णांच्या मदतीसाठी दिला आहे. या मदतीमधून कोव्हीड केंद्रासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले आहे.
उरण तालुक्यासाठी असणारे कोव्हीड हेल्थ केअर सेंटर काही दिवसांपूर्वी कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णांना सेवा मिळत नसल्याने चर्चेत होते. मात्र येथील खाजगी ४० डॉक्टरांच्या टीमने मोफत सेवा देण्याचा निर्णय घेऊन रुग्णांना उत्तम सेवा देण्याचा वसा घेतला आहे.
तसेच येथे आवश्यक असणाऱ्या वस्तू मदती स्वरूपात येऊ लागल्या आहेत. अशाच प्रकारे उरण तालुक्यातील मुस्लिम कम्युनिटीने हेल्थ केअर सेंटर मधील रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. खैरूद्दारिन ट्रस्ट, युनायटेड चॅरिटेबल ट्रस्ट, हयातुल इस्लाम गरीब नवाज ट्रस्ट या संस्थांनीही यामध्ये सहभाग घेतला आहे. महत्वाचं म्हणजे राजाने या पवित्र महिन्यातील होणारा खर्च कमी करून, ही मदत करण्यात आली आहे. यावेळी कोणताही धार्मिक भेतभाव न ठेवता एकमेकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची वेळ आज असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.








Be First to Comment