दिपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्था खुटल – रोहा यांच्या मार्फत आरोग्य केंद्र कोकबन यांच्याकडे मागणी
सिटी बेल । पनवेल । गोवे-कोलाड (विश्वास निकम )
दिपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्था खुटल - रोहा ही संस्था नव्याने सुरु करण्यात आली आहे. तरी त्यांचे ध्येय आणि उद्दिष्टे शैक्षणिक, आरोग्य , सामाजिक , क्रीडा , जनसंपर्क असे आहेत .त्यामुळे ते सतत काहीना काही उपक्रम राबवित असतात . काही महिन्यांपूर्वी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी ४० बॉटल रक्तदान कडून घेतले.
रोहा तालुक्यातील कोकबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड१९ लसीकरणासाठी साधारण ९० गावांचं भार असल्याने तेथे खूपच गर्दी होते. शिवाय रोहा येथून ही अनेक नागरिक लस घेण्यासाठी येथे येत असतात. त्यामुळे चणेरा विभागातील अनेक जेष्ठ नागरिक व अपंग यांना २ / ३ दिवस लस घेण्यासाठी थाबून ही लस मिळत नाही ,असे लक्षात येते. त्यामुळे अवश्यक असणा-यांना चणेरा विभागातील नागरिकांना लसीकरणा पासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. तरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकबन येथिल वैद्यकीय अधिकारी प्रविण जैन यांच्याकडे चणेरा विभागातील कोविड १९ लसीकरण केन्द्र सुरू करावे अशी मागणी केली.
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संतोष भोईर , संघटक अनिल भोईर , सचिव मयूर विचारे , सल्लागार महेंद्र पाटेकर , सभासद जगदीश मुंडे , प्रविण यादव , प्रथमेश बांदल , रुपेश देवळे सुहास गंभे , अभिषेक डेरवणकर . संस्थेमार्फत मागणी केल्याप्रमाणे गावकऱ्यांची गैरसोय होणार नाही व जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण होईल.








Be First to Comment