Press "Enter" to skip to content

सुतारवाडी परिसरात 25 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण, उपचार सुरु

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विशेष काळजी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी मार्फत गावोगावी जाऊन तेथील ग्रामस्थांची अँटीजन चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.या चाचणीत सुतारवाडी परिसरात २५ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

दि.११ मे २०२१ रोजी सुतारवाडी येथील दत्तमंदिरात आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अँटीजन कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत सुतारवाडी, येरळ मिळून दहा जण पॉझिटिव्ह आढळले. तर या अगोदर कामथ येथे अँटीजन चाचणी करण्यात आली. या चाचणीत कामथ येथे १५ रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यात सुतारवाडी येथील एक युवक मृत्यु पावला तर गेल्या वर्षी एक युवक मृत्यु पावला होता.

येरळ ग्रामपंचायतीमार्फत घरोघरी जाऊन ज्यांना सर्दी, ताप , अंगदुखी, डोळे लाल होणे असे जाणवत असेल त्यांनी कोरोना अँटीजन तपासणी करून घेण्यासाठी घरोघरी जाऊन आवाहन करत आहेत. कोणी घाबरून जाऊ नका ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अंगावर काढू नका वेळीच तपासणी करून घेणे सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन ही येरळ ग्रामपंचायती मार्फत करण्यात आला.

गेल्या पाच दिवसांपासून सुतारवाडी नाक्यावरील तसेच परिसरातील सर्व दुकाने पूर्णपणे बंद आहेत. येरळ ग्रामपंचायत मार्फत तसेच सुतारवाडी ग्रामस्थ घरोघरी जावून ग्रामस्थांना जागृत करून कोरोना अँटीजन चाचणी करून घेण्या बाबत सल्ला देत आहेत.
प्रा.आ केंद्र आंबेवाडी अंतर्गत येरळ ग्रामपंचत मधील कामथ, गौळवाडी व सुतारवाडी तसेच हेटवणे ग्रामपंचायतीतील चिंचवली तर्फे दिवाळी येथे सदर कॅम्प चे आयोजन करून कोरोना चाचणी करण्यात आली यामध्ये ज्या रूग्णांना कोरोना ची कुठलीही चिन्हे व लक्षणे दिसून आली नाही परंतु ते चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आहेत अशा रूग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला तर ज्या रुग्णांना कोरोना ची लक्षणे दिसून आली जसे की सर्दी ताप अंगदुखी, डोळे लाल होणे चव न कळणे किंवा वास न येणे आशा रुग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉअंकिता भोईर व डॉ कृष्णा चव्हाण यांच्या माध्यमातून कोरोना सेंटर किल्ला व उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे पाठविण्यात आले काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या सहवासातील व्यक्तीच्या टेस्ट करून वेळीच उपाय योजना करून साथीचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

सदर कॅम्प साठी गावागावातून चांगला प्रतिसाद मिळाला व जनतेने वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय चमुला पूर्ण सहकार्य केले. कोरोना अँटीजन चाचणी कॅम्प चे आयोजन प्रा आ केंद्र आंबेवाडी चे वैद्यकीय अधिकारी डॉ अंकिता भोईर व डॉ चव्हाण यांनी केले तर प्रत्यक्ष चाचणी व तपासणी डॉ स्वप्नाली जांभळे,समुदाय आरोग्य अधिकारी आहेरकर,विशाल अंभोरे,गणेश शिरसाठ,निशिकांत सानप,महेंद्र पवार,यांनी सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहाय्यक एस आर गायकवाड पी एम वारे तसेच पानसरे मॅडम (एल एच व्ही) यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.