सिटी बेल । पाणदिवे । मनोज पाटील ।
आजच्या युगात प्रामाणिकपणा बघायला मिळणे हे भाग्य समजावे लागते .कोप्रोली गावचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गाताडी यांना रस्त्यात सापडलेल्या २४ हजार रूपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल मूळ मालकाला परत करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे .
केळवणे गावचे शशिकांत ठाकूर हे उरणच्या कन्टेनर यार्ड मध्ये सीएचए म्हणून काम करतात .आज सकाळी कामावर जाण्यासाठी आपल्या गाडीवरून जात असतांना खोपटापूल ते उरण या दरम्यांत आपला मोबाईल खिशातून पडला .उरण ला गेल्यावर आपला मोबाईल हरवल्याचे लक्षात आल्यावर मित्रांच्या मोबाईल वरून हरवलेल्या मोबाईल वर काॅल केला असतां तो काॅल लगेच मोबाईल सापडलेल्या शशिकांत गाताडी ने उचलून आपला मोबाईल सुरक्षित असल्याचे शशिकांत ठाकूर यांना कळवून शशिकांत ठाकूर यांना उरण ला बोलावून मोबाईल ठाकूर परत केला .त्या वेळी ठाकूर यांनी शशिकांत गाताडी सारखी प्रामाणिक माणसे असल्यानेच हे जग पुढे चालले आहे असे मत व्यक्त केले.शशिकांत गाताडीच्या प्रामाणिक पणाबद्दल कोप्रोली परिसरातून त्याचे कौतुक होत आहे .








Be First to Comment