निवास गावंड सर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला अनोखा संकल्प

सिटी बेल । कडापे । प्रशांत म्हात्रे ।
आवरे गावातील उदयोन्मुख शिक्षक , समाजप्रिय व्यक्तिमत्त्व , एक उपक्रमशील व्यक्तिमत्त्व , जे सतत सुयश क्लासेस आवरे निगा फौंउडेशन आवरे या माध्यमातून नेहमीच समाजप्रिय उपक्रम सतत राबवित असतत ते लोक आपला वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात म्हणजे ते सांगायची आवश्यकत नाही सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष श्री निवास गावंड सर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा संकल्प केला आहे.

निवास गावंड सर यांनी रा जि प शाळा कडापे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या आधार घेण्याचा हा अनोखा संकल्प केला आहे सदर शैक्षणिक आधार योजनेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-2022 या वर्षासाठी शैक्षणिक साहित्य , विद्यार्थी गणवेश , व विद्यार्थ्यांनाची वार्षिक शालेय फी ही देण्यात येईल अश्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम हा निवास गावंड सर यांनी केला आहे सदर प्रसंगी केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मुंबईकर सर यांनी कडापे गावातील लोकांना कोरोना महामारी लक्षात घेता 100 मास्क चे व पुनाडे आदिवासी वाडी येथे 300मास्क व गोरगरीब विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले रा जि प शाळा कडापे विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्त शैक्षणिक आधार दिल्याबद्दल अश्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल निवास गावंड सर यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
रा जि प शाळा कडापे शाळेच्या व्यवस्थपण कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र थळी आदर्श शिक्षक प्रशांत म्हात्रे सर केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मुंबईकर सर , राणी ताई मुंबईकर सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर , संपेश पाटील , रोहित पाटील , गोल्डन जुबलीच अनिळजी घरत , गणेश थळी सुभाष पाटील या सर्वांनी केले आहे








Be First to Comment