Press "Enter" to skip to content

रसायनीमध्ये मद्यविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई ! १६ तळीरामांवर गुन्हा दाखल

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी दारु विक्रीचे दुकानदार यांना होम डिलीव्हरीव्दारे विक्री करणेबाबत आदेशीत केले असताना देखील रसायनीमध्ये विदेशी दारुचे मद्यविक्रीचे दुकान उघडे ठेवून कोणत्याही प्रकारे सामाजिक अंतर न पाळता दाटीवाटीने गर्दी करु मिळून आले आहेत.

त्यांनी कोरोणा विषाणु रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली घातक कृती करुन जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचे कार्यालयीन आदेशांचे उल्लंघन केले म्हणुन चांभार्ली येथील अमर वाईन्स दुकानात मद्यविक्री आवारात आरोपी १ ) मुशर्रफ रियाउदीन हुसेन वय -२८ वर्ष रा.चांभार्ली २ ) संतोष सटवानी साळवे वय -४७ वर्ष रा.चांभाली ३ ) मनोज दिलीप बिरवाडकर वय -४१ वर्षे रा.नवीन पोसरी मोहोपाडा ४ ) रामचंद्र बल्हारसिंग खत्री वय -३२ वर्ष रा.भोकरपाडा, प्रभुनाथ कन्हैया राम वय ३० वर्ष , रा.भोकरपाडा ६ ) अमित लहु जांभळे वय -३० वर्षे रा.चांभार्ली ७ ) विशाल विजय निंबाळकर वय -२५ वर्ष रा . चांभार्ली ८ ) सुनिल यशवंत गव्हाणकर वय -३० वर्ष ९ ) दिपेश नारायण म्हात्रे रा.मोहापाडा १० ) चेतन नातु शेकावत , ११ ) मुकेश कुमार मंटुराम सैनी १२ ) हरेश किसन वाघमारे यय -३ ९वर्ष रा.तुराडे १३ ) महेंद्र कुमार श्रीरामेश्वर महतो वय -२६ वर्ष रा . चांभार्ली १४ ) उमेश जानकी महतो वय -३४ वर्ष रा . चांभार्ली १५ ) दिनानाथ श्रीराम सुमेर चांभार्ली १६ ) अमरकुमार श्रीरामचंद्र यादव वय -२० वर्ष रा . चांभार्ली यांच्याविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात ५८/२०२२ भा.द.वि.सं. २६ ९ , २७०,१ ८८ नुसार दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास तपासिक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक काळे करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.