सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।
एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघेजण स्कुटीवरुन पसार झाल्याची घटना शहरात घडली आहे.
अश्विनी धुमाळ (50) या पनवेल प्लाझा सी.एच.एस. इमारतीसमोरुन नवीन पनवेल ब्रीजच्या लगत जात असताना स्कुटीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील जवळपास 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र जबरीने खेचून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.








Be First to Comment