सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
महाराष्ट्राचे सुपुत्र व भारतीय सेनेतून निव्रुत्त मिजी सैनिक कै.वसंत दामोदर सावरकर यांच्या दु:खद निधना प्रित्यर्थ त्यांना खांब-वैजनाथ आदी परिसरातील गावातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कै.वसंत दामोदर सावरकर यांचा जन्म १ जून १९४९ रोजी वैजनाथ पो.खांब,ता.रोहा,जि.रायगड येथे झाला.त्यांचा आकस्मिक म्रुत्यू १६ जुलै रोजी ह्दयविकाराचा झटका आल्याने दवाखान्यात नेत असताना झाला.त्यांचे शालेय शिक्षण इ.९ वी पर्यंत कोलाड हायस्कूल येथे झाले.१० वी व नवीन ११ वी पर्यंतचे शिक्षण ग.बा.वडेरे हायस्कूल पाली येथे झाले.देशसेवा करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती व आवड व सोबत त्यांची लढवय्याव्रुत्ती यातूनच १९७९ साली भारतीय सेनेत दाखल झाले.सेवेत असतानाच ते प्रत्यक्ष १९७१ सालच्या पाक युद्धात होते.त्यांचे युनिट होते १०१ फिल्ड रेजिमेंट (एस.पी.)तोफखाना.त्यांच्या युनिटने चांगले काम केले.युद्धाच्या वार्ता निघाल्यानंतर ते आपले अनुभव सांगायचे.त्यावेळी अंगावर काटे उभे राहायचे. ते सेनादलातून १९८४ साली सन्मानाने सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी १२ वर्षे रिलायन्स रसायनी पनवेल येथे सिक्युरिटी म्हणून सेवा केली.सध्या ते खांब येथील साई नगर वसाहतीमध्ये आपल्या पत्नीबरोबर मोठ्या आनंदाने राहत होते.ते कधीही दीर्घ आजही पडले नाहीत. तर त्यांचे आकस्मिक निधन सर्वांना चटका लागून गेले आहे.त्यांचा परिवार फार मोठा त्यातच पाच भाऊ त्यामुळे आप्तेष्ट नातेवाईकही पुष्कळ.परंतू सध्या कोरोना व्हाईरसमुळे नातेवाईकांची इच्छा असून देखील त्यांच्या अंत्यविधीसाठी येता आले नाही.त्यांचा मोठा मुलगा संदीप (B.E M.ECH)अहमदाबाद येथून आपल्या खासगी कंपनीतून अंत्यविधीसाठी यायला निघाला.परंतू खराब रस्त्यामुळे त्याला वेळेवर पोहोचता आले नाही.त्यांचा मधला मुलगा रूपेश पुणे येथे औषध निर्माण कंपनीमध्ये तर छोटा मुलगा प्रशांत पनवेल येथे फायनान्स कंपनीत जाँब करीत आहे. या दोन्ही मुलानी आपल्या वडीलांचे अंत्यसंस्कार पुर्ण केले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ व त्यांचा परिवार,तीन मुलगे व त्यांचा परिवार,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांना समाजसेवेची फार मोठी आवड होती.ते सध्या जेष्ठ नागरिक सेवा संस्था खांब या संस्थेचे अध्यक्ष होते.तर त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई या देखील त्याच संस्थेच्या सदस्या होत्या.त्यांचे दशक्रियाविधी २५ जुलै रोजी वैजनाथ शिव मंदिर येथे तर अंतिमविधी २७ जुलै रोजी खांब साई नगर येथे होणार आहेत.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !






Be First to Comment