Press "Enter" to skip to content

जुगार्यांवर खालापूर पोलिसांची धडक कारवाई

रिस भटवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा…! पैशासह लाखो रुपयांचा माल हस्तगत

पोलीस अधीक्षक अशोक दूधे यांच्या आदेशाने डी.वाय.एस.पी संजय शुक्ला यांच्या पथकाने केली कारवाई

  • सिटी बेल । खालापूर । विकी भालेराव ।
  • खालापूर तालुका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेला आहे, त्यातच रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशाने खालापूर उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांनी आपल्या पथकासह रिस भटवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पैशासह लाखो रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
  • याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना गुप्त माहितीदारा मार्फत रिस भटवाडी येथे एका घरामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली, लागलीच पोलीस अधीक्षक यांनी खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांना सदर माहिती दिली यापुढील कारवाईचे आदेश दिले, शुक्ला यांनी पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तांडेल व आपल्या टीमला सोबत घेऊन रिस भटवाडी येथे गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सदर जागेची पाहणी केली असता नरेश वामन ठोंबरे वय ४९ वर्ष, राहणार रिस भटवाडी तालुका खालापूर यांच्या घरामध्ये जुगार चालू असल्याची कुणकुण लागली, डीवायएसपी यांनी घराभोवती सापळा रचून आपला टीम सोबत आत मध्ये प्रवेश केला असता तेथील टेबलावर तीन पत्ती जुगार चालू असल्याचे निदर्शनास आले,
    एकीकडे कोरोना सारखी महामारी असताना लोकांना जगणे मुश्कील झाले असून दुसरीकडे जुगारा सारख्या नशेत हजारो,लाखो रुपयाची उधलन करणारे महा पापी यांच्यावर रायगड पोलिसांनी आपली नजर वळवली असून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार सारखा अड्डा चालवणारे व त्यांना सहाय्य करणारे महानाम यांच्या रायगड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत,सदर धाडीत पैशासह,चारचाकी गाडी,बाईक,मोबाईल यासह इलेक्ट्रानिक वस्तू सह ३५लाख ८९ हजार १२० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
    सदर मोहीम पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संजय शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक मेहबूब तांडेल, पोलीस हवालदार सचिन काकडे, पोलीस हवालदार धनवी, पोलीस शिपाई केंद्रे, पोलीस शिपाई संकेत पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.
    सगळ कारवाईबद्दल रायगड व खालापूर पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.