Press "Enter" to skip to content

जाताडे जंगलात सापडला अज्ञात इसमाचा सडलेला मृतदेह

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

एमआयडीसी टाकीलगत असलेल्या जाताडे गावाच्या जंगल भागात नितिन यमघर व त्यांचे भाऊ व मित्र असे तिघेजण हिल ट्रेकिंग करत असताना एमआयडीसीच्या टाकीवर असलेल्या जाताडे गावच्या डोंगराच्या जंगल भागात पायवाटेने जात असताना त्यांना एक पुरुष जातीचे प्रेत सडलेल्या अवस्थेत आढळून आले.

त्यांनी सदरबाबत रसायनी पोलिस ठाण्यात माहिती दिली असता रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डि.बी.बालवडकर, पोसई काले घटनास्थळी पोहोचले.

यावेळी खालापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.चौरे उपस्थित होते.सदर मृतदेहाची पाहणी केली असता ते पुरुषजातीचे असून साधारण 50 ते 55 या वयोगटातील असावे,असा पोलिसांनी अंदाज बांधला आहे.याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रसायनी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.