सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरणमधील सीसीसी सेंटर बोकडविरा येथे मनुष्यबळ कमी पडत असल्याने रात्रपाळीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती उरण तहसील कार्यालयातून करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधनात्मक कायदा १९८७ अन्वये अधिसूचना लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उरण तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या पहाता सदर सिडको प्रशिक्षण केंद्र सीसीसी सेंटर बोकडविरा येथे मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने शुक्रवार दिनांक ७ मे पासून ते रविवार दिनांक ३० मे पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये नागाव, नवघर, म्हातवली, चाणजे, भेंडखळ, नवीन शेवा, फुंडे, जसखार, डोंगरी ग्रामपंचायत मधील गजानन काटेकर, कैलास भोईर, प्रताप घरत, सतीश शिरधनकर, अनंत वाघ, मनोज वाल्मिकी, कल्पेश थळे, मंगेश पालवी, गणेश घरत, विलास भोईर, मोरेशवर घरत, मेघश्याम घरत आदींना शुक्रवार दिनांक ७ मे पासून रविवार दिनांक ३० मे पर्यंत सायंकाळी ७ ते सकाळी ८ वाजेपर्यंत नियुक्ती उरण तहसील कार्यालयातून करण्यात आली आहे.







Be First to Comment