Press "Enter" to skip to content

सोनारी, करळ, सावरखार गावात प्रदूषण कायद्याचे उल्लंघन

बेकायदेशीर आरोग्यास घातक सर्विस सेंटरवर होणार कारवाई

सोनारी गावात बेकायदेशीर सर्विस सेंटर : मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अंकुश तांडेल यांनी आणली उजेडात बाब

सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।

उरण तालुक्यातील JNPT परिसरातील सोनारी गावात सुरु असलेल्या बेकायदेशीर सर्विस सेंटर मुळे गावात दुर्गंधी पसरली असून करळ सोनारी सावरखार या तीन गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून केमिकल रासायनिक युक्त पाणी नाल्यावाटे सोडण्यात येत असून यामुळे खूप मोठया प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. हे तिन्ही सर्विस सेंटर अनधिकृत, बेकायदेशीर असून शासनाचे कोणतेही परवानगी नसताना खुलेआम पणे चालू आहे. हे सर्व चालू असताना शासन गप्प कसे, अनेकदा याबाबत शासन दरबारी पत्रव्यवहार करून सुद्धा, शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून सुद्धा या बेकायदेशीर व प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तिन्ही सेंटरवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

याबद्दल सोनारी ग्रामपंचायतचे सदस्य अंकुश तांडेल यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.अंकुश तांडेल यांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार केला होता. याबाबतची पाहणी करण्यासाठी आलेले अधिकाऱ्यांनी पाहणी केले असता सदर सर्विस सेंटर बेकायदेशीर असून यामुळे प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. सदर सेंटर द्वारे प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत असून दुर्गंधी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे अहवाल वरिष्ठांना दिले आहेत.त्यामुळे लवकरच या तिन्ही बेकायदेशीर अनधिकृत सर्व्हिस सेंटरवर आता लवकरच कायदेशीर कारवाई होणार आहे. तसे अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे.

विशेष म्हणजे कोरोना काळात किराणा आणि मेडिकल सोडून बाकी सगळ्या आस्थापना बंद असताना सर्विस सेन्टर बिनधास्तपणे चालू कसे आहे ह्याच्यावर उरण प्रशासन गप्प कसे असा सवाल नागरिकां कडून उपस्थित केला जात आहे.

3 सर्विस सेंटरचे मालक नरेश यशवंत कडू, प्रकाश पांडुरंग तांडेल, काशिनाथ बाबुराव तांडेल हे 3 गावच्या 6 ते 7 हजार लोकांना वेठीस धरत आहेत. करळ, सोनारी, सावरखार या तिन्ही गावात यामुळे दुर्गंधी पसरली आहे.यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे प्रदूषण कायद्याचे उघड उघडपणे उल्लंघन असून ही तिन्ही सर्विस सेंटर बेकायदेशीर आहेत. शासनाची कोणतेही परवानगी नसताना हे सर्वकाही बिनधास्त सुरु आहे. या बेकायदेशीर सर्विस सेंटर विरोधात संबंधित शासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार केला आहे. दिनांक 4/5/2021 रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सुभोध पाटील, विशाल राजपूत साहेब ह्यांनी सोनारी गावात बेकायदेशीर पणे चालू असलेले केमिकल युक्त टँकर., मळीचे टँकर धूत असल्याकारणाने ते पाणी नाल्यावटे जाऊन रोगराई निर्माण होत असल्याचे व आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे मान्य केले. ह्या सर्विस सेन्टर मालकांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची कुठलीही परवानगी नसताना हे कसे चालू आहे. असा सवाल उपस्थित करत ह्याबाबत पाहणी अहवाल वरिष्ठ पातळीवर दिला आहे आणि सर्विस सेंटर मालकावर रीतसर कायदेशीर कारवाई करू असे मला सांगितले आहे. त्या साठी माझा पाठपुरावा चालू आहे.

अंकुश तांडेल ( ग्रामपंचायत सदस्य सोनारी )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.