Press "Enter" to skip to content

चौक जवळील एन डी स्टुडिओ मध्ये अग्नीतांडव

जोधा अकबर सेट जळून खाक : अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल

सिटी बेल । चौक । संजय कदम ।

मौजे हातणोली- चौक ता. खालापूर येथे N.D Studio त जोधा अकबर सेट जवळील फायबर मुर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे आज दुपारी 12.00 ते 12.15 सुमारास मोठी आग लागली आहे.

या आगीमुळे जीवितहानी झालेली नाही. तहसिलदार इरेश चप्पलवार,खालापूर व पोलीस निरीक्षक श्री.विभूते खालापूर यांनी फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या बोलाविल्या असून आग विझविण्याचे काम चालू आहे.

आर्थिक नुकसान झाले आहे, आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.