सिटी बेल लाइव्ह / खांब/रोहा (नंदकुमार मरवडे)
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संपूर्ण देश हतबल झाले आहे.रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने संसर्ग विषाणूचे प्रादुर्भाव रोखणयासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न होत आहेत.महानगर पालिका,नगर पालिका,पंचायत समिती,ग्रामपंचायत आप आपल्या स्तरावर आरोग्य विषयक उपाय योजना म्हणून औषध फवारणी करत आहे.या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून छोटीसी मदत केली पाहिजे या उद्देशाने प्रतिबंधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या गावे,वाडया,वस्ती, परिसरात निर्जंतुकीकरण( सोडियम हायपो क्लोराईडने) फवारणी करण्यात आली आहे.
रोहा तालुक्याची सरकारी यंत्रणा,आरोग्य यंत्रणा,पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस यासाठी काम करत आहेत.या शिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपला परिसर निर्जंतुकीकरण करत आहेत.तर खारगाव ग्रा. पंचायत निर्जंतुकीकरण करतेवेळी सरपंच सलोनी आपणकर ,उपसरपंच नितीन मालुसरे, सदस्य,ग्राम विकास अधिकारी दिलीप पाबरेकर,ग्राम पंचायत कर्मचारी देवाजी गायकर आदींसह विविध गाव,वाड्या, मधील रहिवासी वर्गासह स्वच्छता मित्र,साफ सफाई कर्मचारी वर्ग उपस्थित होते.नागरिकांनी आपले घर सोडून कुठेही जाऊ नका,शासन आपल्या सर्व मदतीला धावून येईल,आपण आहात तेथेच राहा,सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे सामाजिक अंतरता पाळावी व स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे ग्राम पंचायत प्रशासना कडून आवाहन करण्यात आले. तर कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जंतू नाशक फवारणी करण्यात आली.






Be First to Comment