सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।
भारतीय मराठा महासंघ तसेच उरण विधानसभा क्षेत्र शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने एन. आर. आय. पोलीस स्टेशन येथे आज सर्व पोलीस कर्मचारी यांना मास्क सानिटायझर तसेच आरोग्यासाठी आयुर्वेद प्रतिकार शक्ती वर्धक उपयुक्त गोळ्यांचे वाटप भारतीय मराठा महासंघ राज्य प्रमुख बन्सी दादा डोके तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा शिवसेना संघटक व भारतीय मराठा महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष सदानंदराव भोसले, पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, कार्यक्रमाचे संयोजक उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील, नवी मुंबई भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी प्रमुख आशाताई शेकदार, भारतीय मराठा महासंघ कोकण प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव पालांडे, युवा सेना उलवे शहर प्रमुख ऋषी म्हात्रे, शाखा प्रमुख सुरी गौर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भारतीय मराठा महासंघ पनवेल तालुका प्रमुख तसेच उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील यांनी सांगितले की, आजचा कार्यक्रम बन्सी दादा डोके व रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या सौजन्याने संपन्न होत आहे. असे विविध कार्यक्रम अनेक ट्रस्ट तसेच संस्थामार्फत करणे गरजेचे आहे .आरोग्य अधिकारी सफाई कामगार व जे जे कोविड योध्दे आहेत त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.








Be First to Comment