Press "Enter" to skip to content

सिमेंट वाहक ट्रकचा शिळफाटा येथे भीषण अपघात : दोन ठार

सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर ।

कर्नाटकहून सिमेंट गोणी घेवून कर्जत येथे निघालेल्या ट्रकचा खोपोली शिळफाटा येथे भीषण अपघात झाला असून ट्रकचा चक्काचूर झाल्याने चालक ख्वाजापा धर्मा जुबरे (वय30,रा कर्नाटक)आणि पादचारी अल्लाऊद्दीन जहांगिर (वय29,रा.पटेल नगर खोपोली) सिमेंट गोण्याखाली अडकून जागीच ठार झाले .तर प्रसंगावधान राखत  क्लिनर बाबू शंकर काजळे ( वय30 कर्नाटक) याने उडी मारल्याने तो बचावला आहे.

गुरूवारी सकाळी सातच्या दरम्यान जुन्या मुंबई पूणे महामार्गावरून सिमेंट वाहतुक करणा-या ट्रकचे ब्रेकफेल झाल्याने ट्रक अनियंञित झाला.उताराचा रस्ता असल्याने ट्रक भरधाव वेगात येवून खोपोली शिळफाटा येथे रायगड बाजार समोर पलटी झाला.कामावर निघालेला स्थानिक इसम  अल्लाऊद्दीन जहांगिर पलटी झालेल्या ट्रक खाली आल्याने चालकासह तो देखील ठार झाला.

बचावलेला क्लीनर

अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलीस,अपघातग्रस्त मदत पथक आणि स्थानिक नागरिक,माथाडी ग्रुप मदतीला धावले.क्रेनच्या साय्याने ट्रक बाजूला करण्यात आला.मयत चालक आणि अल्लाउद्दीन  याना शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.