सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये ही प्रादुर्भाव वाढल्याने आज सकाळी ७ वाजल्यापासून उरण नगरपालिकेने मास्क न लावणाऱ्या विरोधात कारवाई सुरू केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव उरणमध्ये वाढतच चालला आहे. यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे.
शहरात बाजारपेठ सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू असते. यावेळेत सामानाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमत आहे. त्यामध्ये अनेकजण विनामास्क फिरत असतात. त्यांच्यावर आज उरण नगरपालिकेच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली.
मुख्याधिकारी संतोष माळी यांनी जातीने इतर कर्मचाऱ्यां सोबत शहरात विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे विना मास्क फिरणाऱ्यांना दहशत बसली आहे. तरी ही कारवाई नेहमी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.








Be First to Comment