सिटी बेल । पाणदिवे । मनोज पाटील ।
उलवे येथील प्रतिश वामन पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन श्री हनुमान मंदीर उलवे से. २४ येथील मंदिर परिसरात आवश्यक असणाऱ्या वड- उंबर- पिंपळ-कडूलिंब – बेल – सोनचाफा ईत्यादी वृक्षांचे रोप लागवड करुन आपला वाढदिवस साजरा करण्यात आला, त्याबद्दल श्री.प्रतिश वामन पाटील यांस वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने “निसर्गमित्र” हा सन्मानपत्र बेलवली ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
आज वाढते हवा प्रदुषण, उन्हाळा, आणि ऑक्सिजनची वाढती गरज ह्या विचारानी दुरदृष्टी ठेवत भावी पिढीसाठी वृक्षलागवड ही अत्यंत गरजेची असल्याने सर्वांनी येत्या पावसाळ्या एक तरी झाड लावुन आपले वाढदिवस साजरे करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी दिनेश पाटील यानी व्यक्त केले .तसेच सर्व रोपांची उत्तम प्रकारे निगा राखली जाईल, त्याचें योग्य संगोपन केले जाईल असे वामन पाटील यांनी ग्वाही दिली. याप्रसंगी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, गणेश मढवी, रुपेश घरत, अनिश पाटील, मिलिंद म्हात्रे आदी उपस्थित होते.








Be First to Comment