वेश्वी परिसरात रात्रीस खेळ चाले…
तिवरांवर भराव होतांना प्रशासन गाढ झोपले !
सिटी बेल । उरण । अजित पाटील ।
प्रशासनाचा पगार सुरूच आहे त्यामुळे कुठे काही अनधिकृत होत असेल तर प्रशासन स्वतःहून काहीही करा यास धजावतच नाही असे अनुभव नेहमीच येत आहेत. उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीतील बैलदौंडाखार हद्दीतील एका समुद्री नाल्याच्या बाजूला असलेल्या जमिनीवर भराव करतांना त्या ठिकाणी असलेल्या तिवरांवरही मोठ्या प्रमाणात भराव केला जात आहे . विशेषत: रात्रीच्या अंधारात हे सर्व खेळ केले जात आहेत.
प्रशासनाला या असल्या बाबींकडे धुंकूनही बघायला वेळ नसल्याने नाल्या शेजारील तिवरांची बेधडकपणे हत्या होत असल्याचे समोर आले आहे.
उरण तालुक्यात महसूल खात्याचे नियम जणू काही पायदळी तुडविण्यासाठीच बनले आहेत ! येथील अनेक कंटेनर यार्ड वसताना पावसाळी पाणी निचरा नाल्यांवर अतिक्रमणे झालेली आहेत! तर अनेक कंपन्यांनी आपाल्या कंपणीच्या पाठीमागील असलेल्या शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी ट्रॅक्टर नेण्यासाठी , वाहन नेण्यासाठी पुरेशी रस्ताच ठेवलेली नाही.
याबाबत शेतकऱ्यांनी अगदी जिल्हाधिकारी , पालकमंत्री यांना ही निवेदने देऊन झाली मात्र त्याबाबत आजतागायत कोणताही तोडगा निघालेला नाही त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना आपल्या शेतीवर जाण्यासाठी नाहक अनेक किलोमीटर चा वळसा घालून शेतीवर जावे लागत आहे! मात्र प्रशासनाला याबाबत काहीही देणेघेणेच नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. कंपनी वाल्याचे हात एवढे लांब आहेत की त्यांच्यापुढे शेतकरी मात्र फारच लहान ठरत आहेत. ही सर्व वस्तुस्थिती पाहता वेश्वी परिसरात ही अशाच प्रकारे पुन्हा एकदा सरकारी नियमांना फाट्यावर मारले जाऊ लागले आहे !
या भागातील अनेक सरकारी परीघ नामक जमिनींवर अतिक्रमणे झाल्याच्या वंदता असतानाच आता चिर्ले गाव परिसरातील समुद्री नाल्याच्या कडेला असलेल्या तिवरांचा खुलेआम पणे जीव घेतला जात आहे. या ठिकाणी असलेल्या तिवरांच्या झाडांवर ही भरावाची माती रात्रीच्या अंधारात टाकली जात असल्याने याभागात रात्रीस खेळ चाले असे गमतीने म्हंटले जात आहे. मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या भरावांच्या निमित्ताने तिवरांची मात्र वाट लावली जात असल्याचे दिसून आले आहे.








Be First to Comment