सिटी बेल लाइव्ह / उरण (विट्ठल ममताबादे)
काँग्रेस पक्षाच्या संघटन तसेच प्रसार व प्रचारासाठी व पक्षाची मजबूत मोट बांधण्याच्या उद्देशाने काँग्रेस(आय) पक्षात विविध पदावर कार्यकार्त्यांची नेमणुक करण्यात आली असून सर्व सामान्यांना पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळावा या दृष्टिकोणातुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मान्यते नुसार उरण मधील काँग्रेसचे एकनिष्ठ व प्रामाणिक सक्रिय युवा कार्यकर्ते जितेश म्हात्रे यांची रायगड जिल्ह्याच्या युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे. तसे नियुक्ति पत्र रायगड जिल्हयाचे युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी त्यांना वरिष्ठांच्या आदेशा नुसार दिले आहे.
जितेश म्हात्रे हे पक्षातील निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते असून निवडणुका, संप, आंदोलने, बैठका, विविध पक्षाची कामे आदि पक्षाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गोर गरीब लोकांच्या समस्याची जाणीव असलेला व ग्रॉउंड लेवलला,ग्रास रुटला काम करणाऱ्या या तरूणाची पक्षाने दखल घेतली असून त्याच्या कार्याची पोच पावती म्हणून उरण मधील जितेश दत्ताराम म्हात्रे यांची नेमणुक पक्षाने रायगड जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदि केली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत होत असून सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आदरणीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, देशाचे नेते राहुलजी गांधी, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवासजी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष आर सी घरत,रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप,कामगार नेते महेंद्र घरत, उरण तालुकाध्यक्ष जे ड़ी जोशी,रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण युवक काँग्रेस संघटना मजबूत व अधिक सक्रिय करण्यासाठी प्रयत्नशील राहु असे मत व्यक्त करत जितेश म्हात्रे यांनी सर्व वरिष्ठ पदाधिका-यांचे आभार मानले.






Be First to Comment