Press "Enter" to skip to content

पनवेल परिसरातील ट्रॅकर्सच्या माध्यमातून माथेरानच्या घोडे मालकांना मदतीचा हात

सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका याठिकाणी व्यवसाय करणाऱ्या विविध व्यवसायिकांसह घोडेमालकांना बसला आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून पनवेल परिसरातील ट्रॅकर्सने एकत्र येऊन जवळपास 66 हजार 600 रूपये घोड्यांच्या दाणापाण्यासाठी दिले आहेत.
         

खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास सोनावणे यांच्यासह वपोनि तिदार, वपोनि इंदलकर, जगदाळे, पनवेल महानगरपालिकेचे  सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक राजू गुप्ते, एड. संतोष लाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडे आदींसह अनेक जण एकत्र येऊन दर रविवारी ट्रॅकिंग कऱण्यासाठी पनवेल परिसरातील गड किल्ल्यांवर व डोंगरमाथ्यांवर जात असतात त्यात प्रामुख्याने माथेरानला ते जातातच सध्याच्या काळात माथेरान येथे घोडेस्वारीचा व्यवसाय करणाऱ्या घोडे मालकांना ग्राहक मिळणे कठिण झाले आहे.

आपले कुटूंब सांभाळायचे त्याचप्रमाणे घोड्यांचा दाणापाणी, त्यांची औषधे, निगराणी आदींमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना खर्च होत असतो. अनेकांची एवढी परिस्थितीही नाही आहे. कित्येक जण पारंपारिक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय करीत आहेत. या संदर्भातील त्यांच्या व्यथा वपोनि देवीदास सोनावणे यांच्या पर्यंत पोहोचल्या व त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून सदर रोखरक्कम जमा करून ती आज डिव्हायएसपी खेरडीकर व माथेरानचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत घोडे मालकांकडे सुपूर्त केली आहे. या ग्रुपने या पूर्वीही अनेकांना मदत केली आहे. तसेच दोन वेळा स्वच्छता मोहिमही राबविली आहे.           

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.