सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुका खारपटी केंद्राच्या केंद्रप्रमुख नेहा चंद्रशेखर आपल्या शासकीय सेवेतून सन्मानाने सेवानिवृत्त झाल्या आहेत.
शांत,संयमी ,अभासू,कार्यतत्पर स्मित भाषी नेहा मोरे यांनी सलग ३९ वर्ष आदर्श उपशिक्षक,आदर्श मुख्या.आदर्श केंद्रप्रमुख प्रमुख आपल्याला मिळालेली
जबाबदारी वेळोवेळी यशस्वीपणे पार पाडली.व यशस्वीपणे आपल्या कार्याचा ठसा शैक्षणिक क्षेत्रात उमटवत सरकारी नियमानुसार वयाच्या ५८ वर्षी त्या सेवानिवृत झाल्या.
संपूर्ण सेवाकाळात त्यांना विविध ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. त्या त्या वेळी आपल्या मुळ उद्देशापासून जराही न ढळता आपले कार्य हे चालूच ठेवले.अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदतीचा हात पुढे करून त्यांना जीवनाचा मार्ग दाखविला.तर त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज समाजात विविध क्षेत्रात मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करीत असताना दिसत आहेत.आई-वडील व गुरूजनांचे संस्कार व पुढे सासरच्या सर्व मंडळींकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे तसेच सेवेत असताना वरिष्ठांचे मिळालेले
मार्गदर्शन यामुळे मला जीवनात सतत प्रेरणा मिळत राहिल्याने शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य करायला वाव मिळाला अशाप्रकारच्या भावना त्यांनी सेवानिवृत्ती प्रसंगी व्यक्त केल्या आहेत. तर त्यांच्या या सेवानिवृत्तपर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच त्यांचे आप्तस्वकीय व मित्र परिवार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.








Be First to Comment