सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी परिसरात कोविड सेंटर व्हावे यासाठी परिसरातील सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केले व चार दिवसातच खालापूर तहसिलदार इरेश चप्पलवार यांच्या सहकार्याने पिल्ले काॕलेजची मोहोपाडा येथील हाॕस्टेलची इमारत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नाने मिळाली आहे.दरम्यान दि.२८ एप्रिल रोजी सर्व पक्षीय पदाधिकारी यांची मोहोपाडा नविन पोसरी येथील हनुमान मंदिर येथे बैठक झाली . लगेचच तहसिलदारांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. त्यात पिल्ले काॕलेजची हाॕस्टेलची इमारत मिळाली पाहिजे असे सुचविण्यात आले होते.
यावेळी तहसिलदार इरेश चप्पलवार यांनी वासुदेव पिल्ले यांना फोन करून चर्चा केली व त्यांच्याकडूनही होकार मिळाल्याने कार्य सिद्धीस गेले.यानंतर १ मे रोजी तहसिलदारांनी मोहोपाडा एमआयडीसी काॅलनीतील हाॅस्टेलला भेट देऊन पाहणी केली व इमारत कोविड रुग्णालयासाठी ताब्यात घेतली. त्यानंतर रसायनी – पाताळगंगा विकास समितीकडे देखभालीसाठी दिली.
या इमारतीत लवकरच तज्ञ डाॕक्टरांची टिम सदर जागेला भेट देऊन लवकरच काम सुरू करून लवकरात लवकर कोविड सेंटर सूरू होऊन कोविड रुग्णासाठी उपचार सूरू करण्यात येइल असे मत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिपक कांबळी यांनी व्यक्त केले.या मध्ये आॕक्सिजन बेड , आयसोलेशन सेंटर सूरू करण्यात येईल.भविष्यात व्हेटिलेटर व आय सी यु करण्याचा मानस समितीचा आहे.सदर कोविड सेंटरमुळे रसायनी – पाताळगंगा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान मोहोपाडा येथील पिल्लई हाॅस्टेल इमारत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना देण्याअगोदर पिल्लई रसायनी शाखा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लता कस्तुरे मेनन यांनी मंडळ अधिकारी नितीन परदेशी यांना देखभाल व हाॅस्टेल इमारतीचे काही नुकसान झाल्यास आपली जिम्मेदारी असल्याचे पत्रक दिले आहे.
मोहोपाडा येथील पिल्लई हाॅस्टेल मध्ये कोविड रुग्णालय सुरू होणार असल्याने खालापूर आरोग्य विभागाने रविवार दि.२ रोजी दुपारी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.रोकडे, डॉ.किरण पवार, चौक मंडळ अधिकारी नितीन परदेशी,आरोग्यसेवक आय.पी.पानगे,महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, सभापती वृशाली ज्ञानेश्वर पाटील, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दिपक कांबळी,माजी सरपंच कृष्णा पारंगे, माजी सरपंच अशोक मुंढे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड,काॅग्रेसचे निखिल डवले, संतोष पागंत आदी उपस्थित होते.मोहोपाडा येथील कोविड सेंटर पाहणीसाठी उद्या पालकमंत्री आदितीताईं तटकरे भेट देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.








Be First to Comment