रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या खोपोलीतील तिघांना नारायणगाव पोलीसांनी अटक
सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर ।
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या खोपोलीतील तिघांना नारायणगाव पोलीसांनी अटक केल्यानंतर खालापूर तालुका ढवळून निघाला आहे.या ञिकूटाचे लागेबांधे शोधून कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.नारायणगाव पोलीसानी रेमडेसिवर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या रोहन शेखर गणेशकर याला ताब्यात घेतल्यानंतर खोपोली कनेक्शन उघड झाले.

या रॅकेटमध्ये खोपोलीतील तिघांची नावे समोर आली रेमडेसिवीर इंजेक्शन हे रायगड जिल्हयातील खोपोली येथील आरोपी स्वप्निल सुनिल देशमुुख (गुरव) (वय वर्षे 19, रा. विठठल मंदीरासमोर वरची खोपोली), आकाश प्रकाश कलवार( वय वर्षे 25 रा. लोहानाहाॅल समोर कल्पतरू अपार्टमेंट, वरची खोपोली) आणि विनोद जगदीशप्रसाद जाखोटीया( वय वर्षे 40 रा.विनोद बिल्डींग विनोद सिरॅमीक्स शास्त्रीनगर ( या तिघांकडून घेवून गरजूंना आणि पेशंटच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25000 रूपये प्रमाणे विकले असल्याचे तपासात सांगीतले आहे.विनोद जाखोटीया हा उद्योगपती असताना देखील मयताच्या टाळूवरच लोणी खाण्याचे प्रकार करत असल्याने त्याची खोलवर चौकशीची मागणी होत आहे.
या घटनेनी खोपोलीत प्रंचड संताप व्यक्त होत असून तिघांशी संबधित रॅकेटचा छडा लावा आणि आरोपीना मोका लावा अशी मागणी रूग्णांचे नातेवाईक करित आहेत








Be First to Comment