रुग्णांच्या मदतीकरिता आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था चाणजे विभागा तर्फे केली २४ तास विनामूल्य रिक्षाची सोय
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर ।
कोरोना (कोविड १९ ) ह्या रोगाच्या महामारीनं घातलेलं भयानक थैमान पाहता सर्वसामान्य जनतेच्या मनात भीतीचं काहूर माजलयं त्यातच आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा पाहता जनतेची आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय पाहता ह्या संकट समयी आपल्या हातूनसुद्धा काहीतरी समाजसेवा घडावी ह्याच उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक कार्यात आपलं अनमोल योगदान देणाऱ्या आगरी,कोळी,कराडी संघर्ष सामाजिक संस्था उरण चाणजे विभागा तर्फे संस्थेचे चाणजे विभाग अध्यक्ष सुमित संजय थळे यांच्या औदार्यातून मुळेखंड,तेलिपाडा, कोळीवाडा, कुंभारवाडा ह्या विभागातील ग्रामस्थांनां जर कुणाला सर्दी,खोकला, ताप,श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा कोविड १९ ची टेस्ट करण्या करीता दवाखान्यात जायचं असेल तर ह्या तरुण सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं २४ तास विनामूल्य रिक्षाची सोय करण्यात आली आहे.
चाणजे विभागातील नागरिकांना आवाहन करत ह्या मंडळींनी सांगितलंय कि जर कुणाला आवश्यकता असेल तर त्यांनी निसंकोचपणे जरूर खालील नंबरवर फोन करून आमच्या सोबत संपर्क साधावा आम्हीं आपल्या सेवेस तत्पर आहोत.
यांच्याशी करावा संपर्क
सुमित थळे (चाणजे विभाग अध्यक्ष ) मो. 8970660369 ,
अमोल म्हात्रे ( तेलिपाडा ) मो. 7208178139,
रविंद्र मोकळ ( मुळेखंड ) मो. 9930054569,
चंद्रकांत म्हात्रे ( चंदू …रिक्षा चालक ) मो. 9221532009
Be First to Comment