Press "Enter" to skip to content

बँकेची गुप्त माहिती त्रयस्त व्यक्तीला दिली : कँनरा बँकेच्या कर्मचार्‍या विरोधात तक्रार दाखल 

सिटी बेल । कळंबोली । प्रतिनिधी ।

बँकेतील कोणतीही माहिती त्रयस्त व्यक्तीला देता येत नाही असे बँकेचे निर्बंध असताना जसविंदर दर्शन सिंग यांची कँनरा बँकेची संपुर्ण  माहिती कँनरा बँकेचे कर्मचारी यांनी श्रीमती सुनैना वर्मा यांना देवून बँकेचे व्यवहार धोक्यात आणले आहेत याची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात देण्यात आली असून असा क्राईम करणा-या बँक कर्मचाऱ्यांचा शोध खांदेश्वर पोलिस घेत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष ( ओबीसी सेल)  जसविंदर दर्शन सिंह यांचे नवी येथील कँनरा बँके सीबी डी बेलापूर येथे 3044101002724 या क्रमांकाचे खाते आहे. श्रीमती सुनैना वर्मा व तीचे भागीदार श्रेयंस बाफना या दोघांबरोबर सिंह यांचे काही वर्षांपासून आर्थिक  व्यवहार चालू होते पण दरम्यानच्या काळात त्याच्यांत वाद निर्माण झाले त्यांचा राग काढताना सबंधित बँक कर्मचा-यांना हाताशी घेऊन श्रीमती सुनैना वर्मा व श्री . श्रेयंस बाफना या दोघानी मिळून सिंह यांना विश्वासात न घेता नकळत  त्यांच्या परस्पर  खाते क्रमांकाची संपूर्ण माहितीसह स्टेटमेंट काढून त्यांना वटसप करुन दमदाटी करण्यात आली .

अशी बँकेतील स्टेटमेंट जी गोपनीय माहिती त्रयस्त व्यक्ती देता येत नाही अशी माहिती प्राप्त झाली तर खा-या अर्थाने आँनलाईन आर्थिक व्यवहार हे धोक्यात आले आहेत याला सर्वस्वी बँक कर्मचारी  जबाबदार  आहे असे  म्हणणे काही वावग ठरणार नाही. असे आरोप जसविंदर सिंह यांनी केले आहेत  तेव्हा माझे कँनरा बँकेतील सर्व व्यवहार धोक्यात आले असून अशी खाजगी माहिती त्रयस्त व्यक्तीला देण्यात येत असेल तर सर्व व्यवहार धोक्यात येवू शकतात असे ही त्यांनी सांगितले  अशा क्राईम करणारावर व माहिती मागविणा-यावर  फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करावी की जेणे करून पुन्हा कोण अशी बँकेची गुप्त माहिती दुस-याला देण्याचे धाडस करणार नाही अशी मागणी करत याची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. याची चौकशी खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलिस तपास करत आहेत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.