लोहोप येथील असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची तहसीलदारांकडून पाहणी
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
कोरोनांचा वाढता प्रभाव आणी दिवसेंदिवस कोरोनांचे पेशेंट वाढत असल्यामुळे तालुक्यातील असलेल्या ठिकाणी आरोग्य केंद्रावर कोरोनांचे उपचार सुरु आहे.एकीकडे कोरोनांचे डोस सुरु असतांना दुसरी कडे कोरोना अजूनही पाठ सोडत नसल्यामुळे अनेक ठिकाणी सध्या कोवीड सेंटर सुरु होत आहे.त्यातच एक भाग म्हणून लोहोप येथिल असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी नविन इमारत चे काम पूर्ण झाले असून तहसिलदार अन्य शासकीय अधिकारी यांनी या नव्याने बांधलेल्या इमारतीची पाहणी केली असून या ठिकाणी कोरोना सेंटर कधी होइल या कडे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे.
तालुक्यातील ग्रामस्थ आणी राजकीय पुढारी या ठिकाणी कोवीड सेंटर सुरु व्हावे तसेच कोवीड उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे.यासाठी माजगांव मा.उप सरपंच राजेश पाटील यांच्या माध्यमातून निवेदन ही देण्यात आले.यामुळे येथे कोरोना सेंटर सुरु होण्याच्या हाळचालीला वेग आला याचाच एक भाग म्हणून शासकीय अधिकारी यांच्या इमारती पाहणी करीत आहे.
या ठिकाणी या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध झाल्यास नागरिकांची होणारी धावपळ यांस लगाम लागू शकतो.सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पवार यांचे काम उत्तम प्रकारे सुरु असून लस सुरु झाल्यास इतर केंद्रावरील ताण कमी होइल आणी शिवाय नागरिकांसाठी सोयस्कर होवू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.
या नव्याने बांधलेल्या इमारत ची पाहणी करण्यासाठी शिवाय या ठिकाणी कोवीड सेंटर सुरु होण्याचे संकेत निर्माण होत असल्याचे समजते यावेळी ह्या आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी खालापूर तहसीलदार – इरेश चपलवार,गट विकास अधिकारी – संजय भोये,वैद्यकीय अधिकारी – डॉ.किरण पवार,अधिक्षक अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी ( मुंबई ) अमर सोनावणे, -उप अभियंता रा. आरोग्य अभियान रायगड – अलिबाग,मच्छिंद्र कटारे ,कनिष्ठ अभियंता रा.आरोग्य अभियान रा.जि.प. आलिबाग- विजय देशमुख अदि शासकीय अधिकारी यांनी या इमारतीची पाहणी केली.








Be First to Comment