Press "Enter" to skip to content

रायगडात कोरोना काळात भ्रष्टाचार बोकाळला

पेणमध्ये लिपिकसह एकाला लाच घेताना अटक

सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत ।

रायगड जिल्ह्यात कोरोना काळात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे चित्र दिसत आहे. पेण उपविभागीय कार्यालयात प्रलंबित असलेल्या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी मागितलेल्या ८० हजार रुपयाच्या लाचप्रकरणी दोन जणांना अलिबाग लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

पेण उपविभागीय कार्यालयातील लिपिक जितेंद्र दाभोळे (५२) आणि मनीष म्हात्रे (३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

८० हजारांची मागितली लाच
तक्रारदार यांची पेण तालुक्यातील कोलेटी येथे सर्वे क्रमांक २०/२ जमीन आहे. या जमिनीबाबत पेण उपविभागीय कार्यालयात केस क्रमांक ०८/२०१७ प्रमाणे दावा प्रलंबित आहे. उपविभागीय कार्यलयात सुरू असलेल्या प्रलंबित दाव्याबाबत तक्रारदार यांनी आपल्या बाजूने निकाल लागावा यासाठी दाभोळे यांची भेट घेतली. यावेळी दाभोळे यांनी निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदर लाच मनीष म्हात्रे यांच्याकडे देण्यास सांगितले होते.

दाभोळे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी मनीष म्हात्रे यांच्याकडे ८० हजार लाचेची रक्कम दिली. त्याचवेळी लाचलुचपत पथकाने कारवाई करत मनीष म्हात्रे यांना रंगेहाथ पकडले. तर मुख्य आरोपी जितेंद्र दाभोळे यांनाही अटक केली आहे. त्यामुळे लाचकोंबड्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

दोघांना केली अटक

दाभोळे यांनी मागितलेल्या लाचेबाबत तक्रारदार यांनी अलिबाग लाचलुचपत कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने शहानिशा करून सापळा रचला. दाभोळे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी मनीष म्हात्रे यांच्याकडे ८० हजार लाचेची रक्कम दिली. त्याचवेळी लाचलुचपत पथकाने कारवाई करत मनीष म्हात्रे यांना रंगेहाथ पकडले. तर मुख्य आरोपी जितेंद्र दाभोळे यांनाही अटक केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.