सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण करणे सुरू केले आहे. उरणमध्ये ही लसीकरण सुरू आहे. परंतु लोकसंख्या पहाता लसीकरण केंद्रावर गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी उरण तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले जासई या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी उरण तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लसीकरण सुरू केले आहे. उरणमध्ये इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, कोप्रोली आरोग्य केंद्र व जेएनपीटी हॉस्पिटल अशा ३ ठिकाणी लसीकरण करणे सुरू आहे. परंतु उरणची लोकसंख्या पहाता ही ३ केंद्र अपुरी ठरत आहेत. या ३ केंद्रावर गर्दीही मोठ्याप्रमाणात होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी प्रशासनाने याचा सारासार विचार करून लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण समजल्या जाणाऱ्या जासई येथे लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी शेकाप उरण तालुका पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याची परत माहितीसाठी आरोग्य अधिकारी डॉ. ईटकर यांना देण्यात आली आहे.
Be First to Comment