Press "Enter" to skip to content

आपण यांना पाहिलात का ? 23 वर्षीय विवाहिता बेपत्ता

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता विवाहिता घराबाहेर पडली आहे. ती अद्याप घरी न परतल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सौ.प्रती अरविंद योगी (23 रा.पळस्पे) रंग गोरा, उंची 5 फूट, अंगाने मजबूत, केस काळे लांब, कानामध्ये सोन्याची कर्णफुले, नाकात रिंग, डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत पी गोंदलेले तसेच दोन्ही पायात काळा धागा बांधलेला असून अंगात सफेद रंगाचा पंजाबी ड्रेस व सोबत मोबाईल फोन आहे.

या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पोलीस अंमलदार नितीन अखाडे यांच्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.