Press "Enter" to skip to content

काँग्रेस नेते अभिजित पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

वाढदिवसानिमित्त कोव्हीड रूग्णांच्या उपचारासाठी एक लाखाचा धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कडे केला सुपूर्त !

सिटी बेल । पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी तब्बल एक लाखाचा धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कडे सुपूर्त केला. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील उपस्थित होते.

कोविड झाल्यावर जशी वास घेण्याची क्षमता जाते, जिभेची चव जाते, तसं काहीसं मनाचं झालं आहे. आजूबाजूचं मरणाचं पेटलेलं स्मशान पाहून कुठलाच आस्वाद घेण्याची, आनंद उपभोगायची ईच्छा राहिलेली नाही. आज माझा वाढदिवस. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत साजरा करायचा नाही असं ठरवलं. कोविडशी कडवी झुंज देणाऱ्या महाराष्ट्र सरकारला आपला छोटासा हातभार लावावा म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश रायगडच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी सुपूर्द करून आलो. जे पैसे अन्यथा मौजमजेत खर्च झाले असते, त्यातून कुणालातरी जगण्यासाठी ऑक्सिजन मिळेल हेच एकमेव समाधान !

अभिजित पां. पाटील
कार्याध्यक्ष, पनवेल तालुका काँग्रेस

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.