Press "Enter" to skip to content

कल्याण येथील अशोक जोशी कोरोनाचा सामना करून घरी परतले

बायपास सर्जरी,अँजिओप्लास्टी झालेल्या ७० वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनावर मात

सिटी बेल । आरोग्य प्रतिनिधी ।

कोरोना विषाणूनं आज जगभरातल्या अनेकांची झोप उडवली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशासह राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे.

 कोरोनाची लागण ही वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना लवकर होते, असे वारंवार सांगितलं जात आहे. वृद्ध व्यक्तींना किंवा लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला त्या आजारातून वाचवणे कठीण असल्याचेही डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे. मात्र, कल्याण येथे राहणारे श्री अशोक जोशी ( वय ७०) यांनी मोठ्या हिमतीने कोरोनाचा सामना करून घरी परतले आहेत. कल्याण पूर्व इथे राहणारे अशोक जोशी हे निवृत्त पोलिस कर्मचारी असून ते कल्याण पश्चिम खडकपाडा इथे  एकत्र कुटुंबात राहतात.

जोशी यांच्यावर २००३ साली बायपास सर्जरी झाली होती तसेच २०१५ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. मार्च महिन्यामध्ये जोशी यांच्या घरामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला , घरामध्ये  एकूण १४ माणसे कोरोना पॉजिटीव्ह झाल्या होत्या. श्री अशोक जोशी यांचे वय व पूर्वीची मेडिकल हिस्ट्री पाहता त्यांच्या मुलाने त्यांना कल्याण येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करून उपचार सुरु केले.

जोशी यांच्यावर उपचार करणारे  स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक, जेष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ सांगतात , ” अशोक जोशी जेंव्हा हॉस्पिटलमध्ये भरती झाले तेंव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती परंतु या आजाराबाबत भीती अजिबात नव्हती. त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहता आम्ही त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले व या उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन आठवड्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.” सत्तर वर्षीय  अशोक जोशी याना  कोरोनामुक्त करण्यासाठी स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटलमधील  डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले होते. रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर आणि कर्मचाऱ्याने केलेली रुग्णसेवा ही समाधानकारक आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय अभिनंदनास पात्र आहे. यापुढे कोणीही कोरोनाला घाबरू नये, मी या वयात कोरोनावर मात केली आहे. अशा भावना कोरोना मुक्त झालेल्या ७० वर्षीय अशोक जोशी यांनी बोलून दाखविली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.