सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
कोरोना चा वाढता प्रभाव सध्या दिसून येत असल्यामुळे ग्रूप ग्राम पंचायत इसांबे यांनी जनजागृती मोहीम राबविण्यात आली.कोणतेही आजार यांच्यावर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टर चा सल्ला घेण्यांचे आवाहन केले.
कोरोना संदर्भात आपण कोणीही गाफिल राहू नका.शिवाय मला कोरोना होणार नाही हा गैर समज चुकीचा आहे.यामुळे आपण स्वता सुरक्षित राहून दुसऱ्याला सुरक्षित ठेवा.शासनांने दिलेले नियम पाला.सातत्याने हात धुवा,सॅनिटायझर वापर करा.विशेष म्हणजे विनाकारण घराबाहेर पडू नका कारण आपण सुरक्षित तर आपला कुटुंब सुरक्षित असे आवाहन ग्रूप ग्राम इसांबे यांच्या माध्यमातून करण्यात आले.

त्याचबरोबर इसांबे नजदिक असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लोहोप येथे भेट देवून या ठिकाणी असलेल्या परस्थिती पाहणी केली.लोहप येथिल असलेले आरोग्य केंद्र ह्या ठिकाणी कोवीड लसीकरण सुरु होण्यासाठी यावेळी वैद्यकीय अधिकारी किरण पवार यांस लेखी निवेदन देण्यात आले.यावेळी या परिसरातील ग्रामस्थ यांना भेटून कोरोनावरती आपणांस कशी मात करता येइल यांचे मार्गदर्शन केले.
शिवाय १ मे पासून १८ वर्षानंतर च्या सर्वांनाच लसिकरण सुरु होणार असून तसेच आता सुरु असलेले ४५ वर्षानंतरचे लसीकरण प्रत्येकांनी घ्यावे यामुळे आपण कोरानांवरती विजय मिळू शकतो.सर्व नागरिकांनी कोरोना लस घेणे अत्यंत आवश्यक आहे.नागरिकांमध्ये असलेली भिती दुरु व्हावी शिवाय कोरोना लस आपल्यासाठी किती लाभदायक आहे यांचे महत्व आज ग्रूप ग्राम पंचायत इसांबे यांच्या माध्यमातून समजून सांगितले.
यावेळी सरपंच – पल्लवी देवघरे , उपसरपंच – अनंता पाटील – ,ग्रामसेवक – विजय नलावडे, सदस्य मधुकर शिनगारे,नामदेव तारु, सदस्या – रेश्मा पाटील- ,श्रद्धा मुसळे,हेमलता देवघरे,ताई हिलम, मा. उप सरपंच विष्णू देवघरे,अंगणवाडी मदतनीस – वंदना भांडीलकर,राजिप मुख्याध्यापिका – दिव्या कडव,आशा सेविका – रंजना जाधव,अनिता पाटील,पोलीस पाटील – अनंता देवघरे,ग्रामस्थ विकास देवघरे,समिर देवघरे, पो.पाटील लोहोप – मोहन पाटील,अदि उपस्थित होते.








Be First to Comment