प्राथमिक आरोग्य केंद्र लोहप येथे कोविड लसीकरण सुरु करणे,नविन इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातवरण निर्माण झाले आहे.त्याच बरोबर दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनांचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिक कोविड लस घेण्यास समहती दर्शवीत आहे.यामुळे तालुक्यातील असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोठ्याप्रमाणावर गर्दि होत असल्यामुळे त्यातच कोरोनांचे संसर्ग पसरण्याचे भिती निर्माण होत आहे.
यामुळे लोहप येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोवीड लसीकरण सुरु करावे.त्याच बरोबरच नविन ईमारत चे कोविड सेंटर म्हणून वापरण्यात यावे यासाठी ग्रूप ग्राम पंचायत माजगांव माजी उप सरपंच राजेश पाटील लोहप येथिल वैद्यकीय अधिकारी किरण पवार यांच्या कडे लेखी निवेदन देण्यात आले.
दिवसेंदिवस उन्हाचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिक रणरणत्या उन्हात या लसी घेण्यासाठी तासनतांस उन्हात उभे राहत आहे.त्याच बरोबर ऑनलाईन लसिकरण सुरु असल्यामुळे नागरिक पहाटेपासूनच कोविड लस मिळावी मोठ्याप्रमाणावर गर्दि होत आहे.मात्र काही वेळा लस मिळत नसल्यामुळे घरीच वाट धरावी लागते.त्याच बरोबर खोपोली ,चौक,खालापूर अदि ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे.त्यातच नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्यामुळे लोहप येथे कोवीड लसीकरण सुरु झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोहप हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथील या दवाखान्यात अनेक रुग्ण येत असतात. मात्र त्यांना योग्य तो उपचार मिळावा यासाठी त्या ठिकाणी असलेल्या नविन इमारत कोवीड सेंटर म्हणून चालु व्हावे त्याच बरोबर येथे कोवीड लस द्यावी यासाठी माजी माजगांव उप सरपंच राजेश पाटील, मंगेश पाटील,अमित देवघरे,अमित पाटील,समिर काठावले, मारुती ढवाळकर अदि उपस्थित होते.








Be First to Comment