Press "Enter" to skip to content

रोहे हादरले : रोह्यात गोळी झाडून एकाचा खून !

सिटी बेल । रोहा । समीर बामुगडे ।

रोहा तालुक्यातील डोंगरावरील इंदरदेव-धामणसई येथे एका इसमाचा बंदुकीची गोळी झाडून खून करण्यात आला.

याबाबत फिर्यादी बाळी गणपत हंबीर, वय ४०, रा. इंदरदेव, ता. रोहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २५ एप्रिल रात्री ९ वाजल्यापासून ते दिनांक २६ एप्रिल पहाटे ६ वाजेच्या दरम्यान कार्लीडोंगर इंदरदेव येथे हा प्रकार घडलेला आहे. वरील वेळेत फिर्यादी बाळी हंबीर यांच्या भावावर, म्हणजेच गणपत देवजी शिद यांच्यावर राजू बाळू शिद या आरोपीने गावठी बंदुकीच्या साहाय्याने गोळी झाडली. त्यातच गणपत देवजी शिद यांचा मृत्यू झाला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सदर गुन्ह्याची नोंद रोहा पोलीस ठाणे येथे ००४७/२०२१ भा.दं.वि. कलम ३०२, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५,२७ अन्वये पोलीस ठाणे दैनंदिनी क्रमांक १५ मध्ये पोलीस हवालदार जे. एम .गदमले यांनी केली आहे. ह्या खुनाच्या गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन. व्ही .बंडगर हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.