एक मुलगी 16 वर्षाची तर दुसरी 17 वर्षाची
सिटी बेल । पनवेल ।
पनवेल शहर पोलीस ठाण्याचा हद्दीतुन दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे.
प्रकरण 1
एका 17 वर्षीय 11 महिने झालेल्या मुलीला अज्ञात इसमाने ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून तिला पळवून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सदर मुलगी इयत्ता 10 वी मध्ये शिकत असून रंग गोरा, चेहरा गोल, अंगाने सडपातळ, केस बारीक काळे, कानात साधे डुल, नाकात सोन्याची चमकी, पायात चांदीचे पैंजण असून अंगात पंजाबी ड्रेस घातला आहे. सदर मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या मामाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात केली असून याबाबत अज्ञात इसमाचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
प्रकरण 2
16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत असताना सदरची बस नवीन पनवेल ब्रीजच्या सिग्नल जवळ पेट्रोल पंपाच्या बाजूला थांबली असता सदर मुलगी बसच्या खाली उतरल्यानंतर तीचे अपहरण केल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सदर 16 वर्षीय मुलगी ही वडिलांबरोबर वाशी नवी मुंबई ते पुसद असा ट्रॅव्हल्स बसने प्रवास करीत असताना सदरची बस नवीन पनवेल ब्रीजच्या सिग्नल जवळ पेट्रोल पंपाच्या बाजूला थांबली असता सदर मुलगी बसच्या खाली उतरल्यानंतर तीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबतचा अज्ञात इसमाचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.








Be First to Comment