डॉ. अब्दुल कलाम लाईफ टाईम अचिव्हमेंट नॅशनल अवोर्डने नितीन गाढे सन्मानित
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील मुद्रे बुद्रुक गावातील गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, कल्याण, ठाणे येथे कार्यरत प्राध्यापक. डॉ. नितिन काळूराम गाढे यांना त्यांच्या टिचिंग, रिसर्च आणि पब्लिकेशन कार्याची दखल घेत शिक्षणक्षेत्रातील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ सोसिअल इकॉनॉमिक डेव्हलोपमेंट, बांगलोर,कर्नाटक येथील नामांकित संस्थेचा मानाचा ‘डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम लाईफ टाईम अचिव्हमेंट नॅशनल अवोर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
बंगलोर येथील ए.डी.ए. रंगमंदिर सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात एन आय. टी. आय. गव्हरेर्मेंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. शिवप्पा यांच्या हस्ते डॉ. नितीन गाढे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी कर्नाटक गव्हर्मेंट अधिकारी व अभिनेत्री श्रेया पाटील, अभिनेता विरन केशव आदी उपस्थित होते .भारतामधून विविध राज्यातील कला. नृत्य. गायन, शिक्षण, सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले एकूण 45 सत्कारमूर्तीना यावेळी गौरव करण्यात आला.
या पूर्वी डॉ. गाढे यांनी शिक्षणशास्त्र विषयातून पी एच डी प्राप्त केली असून त्यांना शिक्षण संवेदन राज्यस्तरीय महात्मा ज्योतीबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2016 मध्ये मिळाला असून शिक्षण क्षेत्रातील नवीन बदल स्वीकारत सतत नविण्यपूर्ण उपक्रमात सहभाग घेत असतात ,सिहंगड ग्रुप यांच्या वतीने आयोजित सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे डॉ. गाढे यांचे परिसरातील सर्व थरांतून अभिनंदन होत आहे.








Be First to Comment